
मुंबई - मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी भाषिकांमध्ये नेहमीच वाद होतात. मारहाणीच्या घटनाही घडतात. आता पुन्हा एकदा घाटकोपरमध्ये घरात घुसून एका मराठी कुटुंबावर गुजराती कुटुंबाने हल्ला केल्याच समोर आलं आहे. तसा मारहाणीच सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय.
घाटकोपर पूर्वेला रायगड चौक परिसरात दोन्ही कुटुंब राहतात. मराठी कुटुंबाने घरात कुत्रा पाळला होता. त्यावरुन हा सर्व वाद झाला. मारहाणीची ही घटना रविवारची आहे. दोन्ही कुटुंबांची घर जवळ-जवळ आहेत. मराठी कुटुंबाने घरात कुत्रा पाळला आहे. त्यावर गुजराती कुटुंबाने आक्षेप घेतला होता. त्यावरुन वादावादी झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही कुटुंबात वादावादी होताना दिसतेय. त्यानंतर गुजरातील कुटुंबातील तीन पुरुष घरात घुसून मारहाण करताना दिसतात.
या घटनेनंतर मराठी कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी अजून गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. हा सगळा प्रकार घडण्याआधी खटके उडत असताना मराठी कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये एनसी नोंदवण्यासाठी गेलं होतं. पण त्यावेळी सुद्धा एनसी नोंदवून घेतली नव्हती.
याआधी सुद्धा घाटकोपरमध्ये मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
No comments:
Post a Comment