
मुंबई - हवामान विभागाकडून पुढील ३ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांनी काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबईत मे महिन्यात मान्सून दाखल झाला. पण त्यानंतर काही दिवसांनी पाऊस कमी झाला. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज ७ जून २०२५ रोजी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहे. काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडत आहे.
मुंबईसोबतच नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत या भागांमध्येही पावसाचा जोर वाढेल आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल.
No comments:
Post a Comment