वारक-यांना टोलमाफी, शासनाकडून निर्णय जारी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वारक-यांना टोलमाफी, शासनाकडून निर्णय जारी

Share This


मुंबई - वारक-यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारक-यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. १० मानाच्या पालख्या जाणा-या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंढरपूर वारीसाठी जाणा-या वारक-यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १८ जून ते १० जुलैदरम्यान पालखी मार्गावर वारक-यांना टोलमाफी मिळणार आहे. १० मानाच्या पालख्या जाणा-या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे.

दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जात असतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत हे वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरला जातात. पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी अभूतपूर्व असा सोहळा पाहायला मिळतो. वारक-यांसाठी हा खास सोहळा असतो. वर्षभर वारकरी या क्षणाची वाट पाहात असतात.

दरम्यान या वारक-यांना टोलमाफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निर्णयानुसार पंढरपूरला जाणा-या वारक-यांना टोलमाफी मिळणार आहे. मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोलमाफी मिळणार आहे. जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वारक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वारक-यांना टोलमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे. १८ जून ते १० जुलै दरम्यान वारक-यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. १० मानाच्या पालख्या जाणा-या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वारक-यांना आता या मार्गावर कुठलाही टोल भरावा लागणार नाही यामुळे वारक-यांना दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages