पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पॉइंट फेलुअर, कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात पॉइंट फेलुअर, कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

Share This

मुंबई - मुंबईची लाइफलाईन म्हणून लोकल सेवा ओळखली जाते. ही  लोकलसेवा काही ना काही कारणाने ठप्प होत असते. आज (22 जुलै) रोजी पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाजवळ पॉइंट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे बोरीवली दिशेची वाहतूक २० मिनिटे ठप्प झाली. परिणामी कामावरून उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. 

दादर स्टेशन जवळ रात्री १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास पॉइंट मशीनमध्ये बिघाड झाला. याबाबत प्लॅटफॉर्मवर देखील कोणतीही सूचना देण्यात येत नसल्याने  आणि बराच वेळ प्लॅटफॉर्मवर ट्रेन येत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पॉईंट फेल झाल्यामुळे एका मागोमाग एक लोकलच्या रांगा लागल्या आणि त्याचा फटका रात्री घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. प्रशासनाने तत्काळ पथक घटनास्थळी पाठवत १०:३० वाजता बिघाड दुरुस्त केला. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages