कुटुंब कल्याण कार्यक्रमाकडे पुरुषांनी फिरवली पाठ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुटुंब कल्याण कार्यक्रमाकडे पुरुषांनी फिरवली पाठ

Share This

मुंबई - शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत मुंबईत गत तीन वर्षांमध्ये (२०२२-२३ ते २०२४-२५) पुरुष आणि स्त्री नसबंदी मिळून एकूण ३४ हजार ८०५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यापैकी केवळ १४६७ हजार पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या आकडेवारीवरून कुटुंब कल्याण कार्यक्रमाकडे पुरुषांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. 

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येवर आळा बसवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम मुंबई महानगरात राबविण्यात येते. मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, प्रसूतिगृहे यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष-स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया पार पाडल्या जात आहेत. कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रमांतर्गत गत तीन वर्षांमध्ये (२०२२-२३ ते २०२४-२५) मुंबई महानगरात एकूण ३४ हजार ८०५ पुरुष आणि स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

पालिकेच्या एफ / दक्षिण कुटुंब कल्याण केंद्र विभागाला पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. पुरुष नसबंदी व स्त्री शस्त्रक्रियेनंतर, प्रसूतिपश्चात तांबीनंतर शासन नियमानुसार रुग्णाला मोबदला दिला जातो. स्त्री आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेअंतर्गत अयशस्वी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी तसेच शस्त्रक्रियेदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येते. तसेच, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नि:शुल्क पद्धतीने सेवा पुरविल्या जातात.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अंतर्गत स्त्री नसबंदी आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, तांबी बसविणे, गर्भनिरोधक गोळी (स्त्रियांच्या वापरासाठी), प्रचलित संतती प्रतिबंधक (निरोध), 'अंतरा' इंजेक्टेबल गर्भनिरोधक आदी साधनांचे पालिकेच्या वतीने वाटप करण्यात येते.

संतती नियमनाच्या उपाययोजनांची आकडेवारी

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया १४६७ हजार

स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया ३३ हजार ३३८

अंतरा इंजेक्टेबल गर्भनिरोधक इंजेक्शन १० हजार १७५ महिला

तांबी (कॉपर टी) ६१ हजार ३५३ महिला.

संतती प्रतिबंधक (निरोध) ३२ हजार ७० जणांना

गर्भनिरोधक गोळ्या ५६ हजार महिला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages