24 तासात 6 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

24 तासात 6 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता

Share This

मुंबई - महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थितीमुळे ५ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्याच्या विविध भागात ६ एसडीआरएफ पथकांसह एकूण १८ एनडीआरएफ पथके तैनात आहेत. 

4 दिवसात 21 मृत्यू - 
१५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाःकार माजवला असून अजूनही पाऊस थांबलेला नाही. तसंच सकाळी लवकर भरती असल्याने आणि पाऊस चालू राहिल्यास काय स्थिती असेल याची कल्पनाही मुंबईकरांना करणं कठीण झालं आहे. शक्यतो घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनेक शाळांनी आज ऑनलाईन क्लास घेतले असून मुलांसाठी हे सोपे झाले आहे. तसंच खासगी कार्यालयातून अनेकांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांची फरफट होणार नाही. ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, भिवंडी, पालघर येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई ठप्प - 
मुसळधार पावसामुळे मुंबई शहर ठप्प झाले आहे. रस्ते, रुळ आणि पुलांवर पाणी साचले आहे. शाळा आणि ऑफिसला जाणारे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. बीएमसीने लोकांना शक्य तितके कमी बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. खूप गरज असेल तरच घराबाहेर पडा असे सांगण्यात आले आहे. आज सकाळी १०:१९ वाजता भरती आहे, ज्यामध्ये २.६६ मिमी लाटा उसळतील. किनारी भागात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. आजही मुंबईत पावसामुळे शहराची परिस्थिती वाईट आहे. अनेक भागात पाणी साचले आहे आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तसंच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages