अतिमुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांमधील दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अतिमुसळधार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांमधील दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी

Share This

मुंबई - भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (दिनांक १८ ऑगस्ट २०२५) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर केली आहे.

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages