Ladki Bahin Yojna : लाभार्थ्यांना 2 महिन्यात ई-केवायसी करावी लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Ladki Bahin Yojna : लाभार्थ्यांना 2 महिन्यात ई-केवायसी करावी लागणार

Share This

मुंबई - ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी राज्य सरकारने योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. सर्व लाभार्थी महिलांना पुढील 2 महिन्यांच्या आत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

लाडकी बहीण लाभार्थी महिलांसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा सुरू करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, आधार कायद्यातील तरतुदींनुसार या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे, आता या विभागामार्फत ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण केले जाणार आहे.

शासनाच्या या नवीन निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षात हे परिपत्रक जारी झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी या कालावधीत आधार प्रमाणीकरण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही ई-केवायसी प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून, ती भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages