
मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील जुन्या पंतनगर तिकीट घराजवळ एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी मध्यरात्री हा व्यक्ती तिकीट घराच्या पायाऱ्यांजवळ झोपला असताना जेसीबीची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृत व्यक्तीजवळ कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. रेल्वे पोलिसांनी जेसीबी चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल दाखल केला आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकावरील जुने तिकीट घर पाडण्यात येऊन तिथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी जेबीसी उभा करण्यात आला होता. त्याच्या बाजूलाच पायऱ्यांजवळ मयत व्यक्ती झोपलेली होती. जेसीबी घेण्यासाठी आलेल्या चालकाला झोपलेली व्यक्ती दिसली नाही. आरोपीवर चढला आणि जेसीबी सुरू केला. जेबीसी मागे पुढे नेल्यानंतर आवाज आला. त्यामुळे कशाला तरी धडक बसल्याचे आरोपीच्या लक्षात आले. त्यानंतर आरोपी जेबीसीतून खाली उतरला आणि त्याने बघितले. तेव्हा मयत व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली होती. त्याला बघून तो घाबरला आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांकडून शोध सुरू -
"एका प्रत्यक्षदर्शीने याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. एका जेसीबीने झोपलेल्या व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर जेसीबी चालक भांडुपच्या दिशेने पळून गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीलाही झालेल्या घटनेची माहिती दिली आणि घरातून फरार झाला. त्याने मोबाईल बंद केलेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत."
- संभाजी यादव
वरिष्ठी पोलीस निरीक्षक
कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे

No comments:
Post a Comment