Elphinstone Bridge Closure : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Elphinstone Bridge Closure : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद

Share This

मुंबई - ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल अखेर शुक्रवार, १२ सप्टेंबरला रात्री १२ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. त्यानुसार एलफिन्स्टन पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

परेल व प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व-पश्चिमेला जोडणारा एलफिन्स्टन पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी २५ एप्रिलपासून एलफिन्स्टन पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार होती. मात्र, रहिवाशांचे पुनर्वसन, पर्यायी पादचारी पुलाची उभारणी आणि नवीन पूल उभारणीचा निश्चित कालावधी जाहीर करण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यास विरोध केला होता. अखेर गुरुवारी वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करत शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा पूल बंद करण्यात आल्याने दादर पूर्वेकडून दादर पश्चिमेकडे व दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना टिळक ब्रिजचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे, तर परेल पूर्वकडून प्रभादेवी व लोअर परेलला जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत); परेल, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारे वाहन चालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांकरीता

१) दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाणारे वाहनचालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील.

२) प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रूग्णालय व के. ई. एम. रूग्णालय येथे जाणारे वाहन लक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील (१५:०० ते रात्री २३:०० पर्यंत).

३) कोस्टल रोड व सी-लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परेल, भायखळा पूर्वेकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.

करी रोड रेल्वे ब्रिजचे वाहतूक नियोजन

१) महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडून (भारत माता जंक्शन) शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा चालू राहील. (सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत)

२) महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे ब्रिज) शिंगटे मास्तर चौककडून कॉम्रेड कृष्णा देसाई चौककडे (भारत माता जंक्शन) वाहतूक एक दिशा चालू राहील. (दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत)

३) महादेव पालव मार्गच्या (करी रोड रेल्वे ब्रिज) दोन्ही वाहिन्या वाहतुकीसाठी चालू राहतील. (रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंत)

नो पार्किंग मार्ग

१) ना. म. जोशी मार्ग : कॉमेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) ते धनमिल नाकापर्यंत दोन्ही वाहिनी.

२.) सेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक (एलफिन्स्टन जंक्शन) ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिनी.

३) महादेव पालव मार्ग : कॉमेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौकपर्यंत दोन्ही वाहिनी.

४) साने गुरूजी मार्ग : संत जगनाडे चौक ते कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) पर्यंत दोन्ही वाहिनी.

५)भवानी शंकर मार्ग : हनुमान मंदिर, कबुतरखाना ते गोपीनाथ चव्हाण चौकपर्यंत दोन्ही वाहिनी.

६) रावबहादूर एस. के. बोले मार्ग : हनुमान मंदिर ते पोर्तुगिज चर्चपर्यंत दोन्ही वाहिनी.

७) संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दोन्ही वाहिन्या.

वाहतूकीस दुहेरी मार्ग चालू

१) सेनापती बापट मार्ग : वडाचा नाका ते फितवाला जंक्शनपर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages