Ladki Bahin Yojana - लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Ladki Bahin Yojana - लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार

Share This

मुंबई - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 13 हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हफ्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे. त्यामुळं ऑगस्ट महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणं सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे 26 लाख महिलांची गृहचौकशी केली जाणार आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. ज्या कुटुंबात दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील, त्याकुटुंबातील एका महिलेचा आर्थिक लाभ बंद करण्यात येणार आहे.

महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 13 हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages