मध्य रेल्वेवर १७.१९ लाख प्रवाशांचा विनातिकीट प्रवास, १०० कोटींचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वेवर १७.१९ लाख प्रवाशांचा विनातिकीट प्रवास, १०० कोटींचा दंड वसूल

Share This


मुंबई - मध्य रेल्वेने वर्षभर राबविलेल्या जोरदार आणि नियमित तिकीट तपासणी मोहिमांद्वारे मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान लक्षणीय दंड वसूल केला. विनातिकीट प्रवास करणाऱ्या १७.१९ लाख प्रवाशांना ताब्यात घेतले आणि विक्रमी दंड रु.१००.५० कोटी वसूल केला.

ऑगस्ट २०२५ महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी टीमने २.७६ लाख प्रवाशांना विनातिकीट/वैध तिकीटाशिवाय प्रवास करताना ताब्यात घेतले, जे ऑगस्ट २०२४ मधील २.३४ लाख प्रवाशांशी तुलना करता १८% वाढ दर्शवते. ऑगस्ट २०२५ मध्ये विनातिकीट/वैध तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्यांकडून रु.१३.७८ कोटी दंड वसूल केला गेला, तर ऑगस्ट २०२४ मध्ये या दंडाची रक्कम रु८.८५ कोटी होती, यामुळे ५५% पेक्षा जास्त वाढ दिसून येते.

वर्षभरातील कारवाई -
मुख्यालयात १.०४ लाख प्रकरणांमधून ७.५४ कोटी रुपये


मुंबई विभागात ७.०३ लाख प्रकरणांमधून २९.१७ कोटी रुपये

भुसावळ विभागात ४.३४ लाख प्रकरणांमधून ३६.९३ कोटी रुपये

नागपूर विभागात १.८५ लाख प्रकरणांमधून ११.४४ कोटी रुपये

पुणे विभागात १.८९ लाख प्रकरणांमधून १०.४१ कोटी रुपये

सोलापूर विभागात १.०४ लाख प्रकरणांमधून ५.०१ कोटी रुपये

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages