Doctor's Strike: महाराष्ट्रातील डॉक्टर आज संपावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Doctor's Strike: महाराष्ट्रातील डॉक्टर आज संपावर

Share This

मुंबई - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या सर्वांत मोठ्या संघटनेशी संलग्न राज्यभरातील सुमारे एक लाख ८० हजार डॉक्टर आज (गुरुवारी) संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या निषेधार्थ आज डॉक्टर संप करणार आहेत. (Doctors Strike)

राज्य सरकारने ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. आतापर्यंत परिषदेमध्ये केवळ आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांची नोंदणी होत होती. मात्र नव्या निर्णयामुळे रुग्णहिताला बाधा निर्माण होण्याची भूमिका घेत, इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाविरोधात एक दिवसाचा संप पुकारला आहे. राज्यातील एक लाख ८० हजार डॉक्टर यामध्ये सहभागी होणार आहेत.

मुंबई असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस्, सेंट्रल मार्ड , वरिष्ठ बंधपात्रित निवासी डॉक्टर आणि इंटर्न डॉक्टर एक दिवसाच्या संपाला पाठिंबा देणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितले.‘हा वादग्रस्त आदेश तत्काळ रद्द करून आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रतिमा जपावी, रुग्णांची प्रतिष्ठा राखावी, असे आवाहन ‘आयएमए’ने केले आहे.

होमिओपॅथी डॉक्टरांचा मार्ग तूर्त मोकळा
आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमसी) स्वतंत्र नोंदवहीत आपली नोंदणी करून अॅलोपॅथीचीही वैद्यकीय सेवा देण्याचा मार्ग तूर्त मोकळा झाला आहे. कारण अशी नोंदणी करण्याविषयी राज्य सरकारने ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला अंतरिम स्थगिती देयास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. परंतु, अशी नोंदणी व अॅलोपॅथीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवणे हे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमा (आयएमए) याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, असे न्या. रियाझ छागला व न्या. फरहान दुबाष यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages