Mumbai Metro कुलाबा ते आरे थेट प्रवास, मेट्रो-३ संपूर्ण मार्गिका ३० सप्टेंबरपासून सेवेत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai Metro कुलाबा ते आरे थेट प्रवास, मेट्रो-३ संपूर्ण मार्गिका ३० सप्टेंबरपासून सेवेत

Share This


मुंबई - संपूर्ण ३३.५ किमी लांबीच्या कुलाबा - आरे मेट्रो-३ (अक्वा लाईन) मार्गावर प्रवास करण्याची संधी मुंबईकरांना चालू महिनाअखेर मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरातील पहिल्या परिपूर्ण भूमिगत रेल्वेमार्गाचे उद्घाटन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी येथील एनएससीआयमध्ये आयोजित मुंबई भाजपच्या अधिवेशनात केली.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबरला वरळी ते कफ परेड या भूमिगत मेट्रो-३च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि उपनगरे यांच्यातील दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर संपूर्ण १०.९९ किमी मार्गाची अंतिम सुरक्षा तपासणी करून सप्टेंबर अखेरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या आरे (गोरेगाव) ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या २२.४६ किमी मार्गावर भूमिगत मेट्रोची सेवा सुरू असून एप्रिलपासून अंतिम टप्प्यात कफ परेडपर्यंत प्रायोगिक फे-याही सुरू आहेत.

प्रमुख उत्तर-दक्षिण मेट्रो

- ३३.५ किमी (पूर्णपणे भूमिगत)

-स्टेशन : एकूण २७ (२६ भूमिगत, १ ग्रेड स्टेशनवर)

-खर्च : ३७,२७६ कोटी रुपये

स्थानके : विज्ञान केंद्र, महालक्ष्मी मेट्रो, जगन्नाथ शंकरशेठ मेट्रो, ग्रँट रोड मेट्रो, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो, हुतात्मा चौक, चर्चगेट मेट्रो, विधान भवन, कफ परेड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages