Mumbai Water pipeline leakage - मंत्रालयासमोर पाण्याची पाईपलाईन फुटली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai Water pipeline leakage - मंत्रालयासमोर पाण्याची पाईपलाईन फुटली

Share This

मुंबई - महाराष्ट्राचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयाच्या समोर आज अचानक पाण्याची पाईपलाईन फुटली. यामुळे मंत्रालयाच्या गेटसमोर पाणीच पाणी साचलं. पाण्याचा प्रेशर खूप जास्त असल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलं. मंत्रालयाच्या समोरील दोन्ही बाजूने जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचलं. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवली. यावेळी पाण्यामधूनचं वाहनं रस्ता काढताना बघायला मिळाली.

मंत्रालयासमोरच्या रस्त्याखालून पाण्याची पाईफलाईन कफ परेडच्या दिशेला जाते. पाईपलाईन फुटल्याची घटना ही आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पाईपलाईन फुटली तेव्हा मोठ्या प्रमाणात दगड उडाले आणि काही जणांना इजा पोहोचल्याचीदेखील माहिती समोर आली. पाण्याचा प्रेशर जास्त असल्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला. याशिवाय मरीन ड्राईव्हकडे जाणारा रस्ता यामुळे खचलेला बघायला मिळाला.  

पाईपलाईन फुटल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. तसेच मुंबई महापालिकेला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मंत्रालय परिसरात दाखल झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. यानंतर पाण्याचा निचरा करण्यात आला. 

कफ परेड, आंबेडकर नगर या भागात जाणारी ही पाईपलाईन होती. या भागात काही तास पाणी पुरवठा होणार नाही, अशी देखील माहिती महापालिकेने दिली आहे. दरम्यान, घटना घडली तेव्हा सुदैवाने मंत्रालय परिसरात गर्दी नव्हती. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. जी पाईपलाईन फुटली ती 650 एमएमची पाईपलाईन होती. या पाईपलाईनमध्ये अचानक प्रेशर वाढल्याने पाईपलाईन फुटली, अशी माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages