
ठाणे - ठाणे महानगर परिवहन (TMT) मध्ये बस कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या 40 वर्षीय महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने तक्रार दिली असून त्यानुसार टीएमटी चालक सचिन शरद जोशी याने विवाहाचे खोटे आश्वासन देत तिचे शारीरिक शोषण केले. इतकेच नव्हे तर पीडितेच्या पगारातील तब्बल ३० हजार रुपये हडप केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
पीडित महिला काही वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या टीएमटी बस सेवेत कंडक्टर म्हणून काम करत आहे. कामाच्या ठिकाणी चालक सचिन शरद जोशी याची तिच्याशी ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि त्याच विश्वासात महिलेने संबंध ठेवले. मात्र कालांतराने तो विवाह करण्यास नकार देत होता. याच दरम्यान, त्याने तिच्याकडून विविध कारणांनी पगारातील ३० हजार रुपये घेतले, असे तक्रारीत नमूद आहे.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे टीएमटी प्रशासन आणि कर्मचारी वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महिलांना सुरक्षित कार्य वातावरण मिळावे यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment