सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा

Share This

सोलापूर - सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली. यातील १७ प्रशिक्षणार्थी पोलिसांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिकृत कारणांचा शोध घेतला जात आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवला. त्यानंतर एकामागून एक प्रशिक्षणार्थी आजारी पडत गेल्याने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. यामधील १७ जणांवर विशेष उपचार सुरू आहेत, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास १,४०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी मोठ्या संख्येने बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages