
मुंबई (जेपीएन न्यूज) - महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. १२ हजारांपेक्षा जास्त पुरूषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचे १२ हजार पुरूषांनी प्रत्येक महिन्याला १५०० रूपये लाटले आहे. ही माहिती समोर आल्यानंततर ही तर लाडके भाऊ योजना असल्याची टीकी केली जातेय.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सूरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. लाभार्थ्यांची आकडेवारी, सरकारी कर्मचा-यांनी लाटलेले पैसे तर कधी केवायसी योजना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतेच. आता यामधील मोठा स्कॅम समोर आला आहे. माहिती अधिकात १२ हजार ४३१ पुरूषांनी वर्षभरापासून या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून या पैशांची वसूल केली नसल्याचेही समोर आले आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचे वृत्त दिले आहे.
लाडकी बहीण योजनासंदर्भात माहिती अधिकारात सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबत सरकारकडून काही माहिती दिली आहे. त्यानुसार, मागील वर्षभरात १२४३१ पुरूषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. पुरूषांनी लाभ घेतल्याचे याआधी फक्त दावे केले जात होते. पण आता याबाबत सरकारकडूनच अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लाभार्थी लाडक्या भावांना यादीतून काढण्यात आले. पण त्यांनी आतापर्यंत प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा लाभ घेतला, त्याचं काय? त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
२४ कोटी २४ लाख रुपये हडप -
१२४३१ पुरूषांनी प्रत्येक महिन्याला सरकारच्या तिजोरीतून १५०० रूपयांचा लाभ घेतला. आतापर्यंत या अपात्र लाडक्या भावांनी २४ कोटी २४लाख रूपये लाडकीचे पैसे हडप केले आहेत. तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे १४०.२८ कोटींचा भुर्दंड सरकारला बसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. इतकी नावे समोर आली असली तरी अद्याप कोणत्याही व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या लाभाच्या वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली नाही.

No comments:
Post a Comment