
मुंबई - ऐरोली पुलावर गुरुवारी (23 ऑक्टोबर) सकाळी झालेल्या अपघातात सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी सुमारे 10:05 वाजता हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत बसमधील काही प्रवासी आणि टेम्पोचालक जखमी झाले आहेत. (Best Bus Accident)
अपघाताची माहिती मिळताच वीर सावरकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (AMO) आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना तत्काळ वीर सावरकर रुग्णालय, मुलुंड येथे दाखल करण्यात आले.
रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 7 जण जखमी झाले असून, त्यापैकी 2 जणांना पुरुष शस्त्रक्रिया वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे, तर उर्वरित 5 जणांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनेची नोंद पोलिसांकडून घेण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा