२०२३ मध्ये देशात १०,७८६ तर महाराष्ट्रात ४१५३ शेतक-यांचा आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२०२३ मध्ये देशात १०,७८६ तर महाराष्ट्रात ४१५३ शेतक-यांचा आत्महत्या

Share This

नवी दिल्ली - सन २०२३ मध्ये देशभरात शेतीशी संबंधित १०,७८६ लोकांनी आत्महत्या केल्या. त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ३८.५ टक्के म्हणजेच ४१५३ शेतकरी आत्महत्यांचा (Farmer suicide) समावेश आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. 

आत्महत्या केलेले शेतकरी व शेतमजुरांमध्ये ९९८६ पुरुष तर ८०० महिलांचा समावेश आहे. शेतक-यांच्या आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक (२२.५ टक्के), आंध्र प्रदेश (८.६ टक्के), मध्य प्रदेश (७.२ टक्के) आणि तामिळनाडू (५.९ टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. 

अहवालातील इतर आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये बालकांविरुद्ध १.७७ लाख गुन्हे नोंदवले गेले, जे २०२२ मध्ये १.६२ लाख होते. जे वर्षात ९.२% वाढले आहेत. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये ०.७% आणि वृद्धांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये २.७% वाढ झाली. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये ४४८,२११ गुन्हे नोंदवले गेले, ज्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे पती किंवा नातलगांकडून छळ, अपहरण, बलात्कार आणि छेडछाड ही होती. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान आघाडीवर आहेत.

विद्यार्थी आत्महत्या वाढल्या - 
२०२२ मध्ये १३,०४४ पेक्षा ६.५% वाढ होऊन १३,८९२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. हे आत्महत्यांच्या ८.१% आहे. २०१४ मध्ये ८,०३२ आत्महत्या होत्या, दहा वर्षांत ६४.९% वाढ आहे.

बेरोजगार आत्महत्येच्या घटना - 
एकूण १४,२३४ बेरोजगारांपैकी केरळमध्ये २,१९१ (१५.४%) आत्महत्या. त्यानंतर महाराष्ट्र (१४.५%), तामिळनाडू (११.२%) आणि उत्तर प्रदेश (९.१%) यांचा क्रमांक लागतो.

अत्याचार सर्वाधिक राजस्थानात - 
राजस्थानात सर्वाधिक ५,०७८ अत्याचार. यूपीत ३,५१६, तर बिहारमध्ये ९०२ अत्याचाराचे गुन्हे. अल्वयीनांवरील अत्याचाराच्या यूपीत सर्वाधिक ३०१ घटना.

ऑनलाइन फसवणुकीत मुंबई अव्वल - 
१९ महानगरांमध्ये ऑनलाइन फसवणूक सर्वाधिक. २,३९६ अशा घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ऑनलाइन कागदपत्रांच्या फसवणुकीची ४५ प्रकरणे नोंदली गेली आहेत. महिला-मुलांचा सायबर स्टॉकिंग/गुंडगिरीमध्ये मुंबई दुस-या क्रमांकावर आहे (११९), तर हैदराबाद पहिल्या (१६३) स्थानी.

सायबर गुन्ह्यांत ३१% वाढ - 
२०२३ मध्ये सायबर गुन्ह्यांची ८६,४२० प्रकरणे नोंदवली गेली. फसवणूक, लैंगिक शोषण, खंडणी ही मुख्य कारणे होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages