मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा विजय कुमार यांनी कार्यभार स्वीकारला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा विजय कुमार यांनी कार्यभार स्वीकारला

Share This

मुंबई - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून विजय कुमार यांनी १.१०.२०२५ पासून कार्यभार स्वीकारला. ते भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (IRSME), १९८८ बॅचचे अधिकारी आहेत. कुमार यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये महाव्यवस्थापक म्हणून ७०० लोकोमोटिव्हच्या उत्पादनाचा ऐतिहासिक उपक्रम यशस्वीरीत्या हाताळला आहे. (Vijay Kumar)(General Manager)(Central-Railway)

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पद स्वीकारण्यापूर्वी, विजय कुमार यांनी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (सीएलडब्ल्यू) मध्ये महाव्यवस्थापक म्हणून कार्य केले, जिथे त्यांनी सीएलडब्ल्यू ला नव्या उंचीवर नेण्यासाठी गतिशील नेतृत्व प्रदान केले. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सीएलडब्ल्यू ने ७०० जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्पूर्ण लोकॉमोटीव्हचे उत्पादन करून इतिहास रचला.

सध्याच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७७७ लोकोमोटिव्हचे वाढीव आणि आव्हानात्मक लक्ष्य देण्यात आले होते, त्यापैकी पहिल्या  ६ महिन्यांतच सीएलडब्ल्यू ने ४१७ लोकोमोटिव्ह बनविले आहेत. त्यांच्या ३५ वर्षांहून प्रदीर्घ कारकिर्दीत, त्यांनी भारतीय रेल्वेत अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले असून उत्तर-पश्चिम रेल्वे, रेल्वे बोर्ड, उत्तर रेल्वे आणि संशोधन, डिझाईन व मानक संस्था (आरडीएसओ) यांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

रेल्वे बोर्डमधील कार्यकाळात, त्यांनी स्पॅनिश डिझाइनच्या अॅल्युमिनियम कोच असलेल्या ‘टालगो ट्रेनच्या’ गती चाचण्यांचे नेतृत्व केले आणि गोल्डन क्वॉड्रिलॅटरसह सर्व सेमी हाय-स्पीड मार्गांचे ते नोडल अधिकारी होते.
आरडीएसओ मध्ये त्यांच्या कार्यकाळात, ते भारताच्या उत्तर भागासाठी सहा वर्षांहून अधिक काळ निरीक्षण व समन्वय (I&L) विभागाचे संचालक होते.

त्यांनी नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) मध्ये कार्यकारी संचालक/रोलिंग स्टॉक आणि रोलिंग स्टॉक संचालक म्हणून ५ वर्षांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

विजय कुमार यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदीगड येथून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.टेक केले आहे. त्यांनी सिंगापूर व मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम, क्रिस सीआरआयएस/नवी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण तसेच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथे धोरणात्मक व्यवस्थापन विषयक कार्यशाळा पूर्ण केल्या आहेत.

त्यांनी कामाच्या संदर्भात २० पेक्षा अधिक देशांना भेटी दिल्या असून भारतीय रेल्वेच्या तांत्रिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. विजय कुमार यांना माननीय रेल्वेमंत्रीयाद्वारे तीन वेळा पुरस्कृत करण्यात आले आहे. 

१९९५ मध्ये आलमबाग डिझेल शेडमधील लोको बिघाडांमध्ये ३५% घट करून लोको उपलब्धता वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी.

१९९९ मध्ये लुधियाना डिझेल शेड येथे लोकोमोटिव्हच्या विश्वासार्हतेत १५०% लक्षणीय वाढ घडवून आणण्याच्या त्यांच्या समर्पित प्रयत्नांसाठी. 

आणि पुन्हा २०११ मध्ये राजभाषा वृद्धितील त्यांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल.

१९९२ मध्ये त्यांना रेल्वे बोर्डातील मेंबर यांच्याकडून पुरस्कार मिळाला होता. हा सन्मान त्यांनी अभिनव कल्पना आणि स्थानिक कौशल्याच्या आधारे 2 टन बॅश पावर हैमर (Bache Power Hammer ) कार्यान्वित केल्याबद्दल आणि त्यांच्या पहिल्याच पोस्टिंगच्या पहिल्या ६ महिन्यांच्या अल्प कालावधीत फाउंड्री शॉपचे उत्पादन ६,००० वरून १५,००० प्रति महिना इतके वाढविल्याबद्दल मिळाला.

तसेच, २००६ मध्ये आरडीएसओ चे महासंचालक यांनी आरडीएसओ येथे उपयोगकर्तयाच्या (Consignee) तक्रारींमध्ये १५०% घट घडवून आणण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान केला.

परिणामकेंद्रित नेतृत्वासाठी परिचित असलेले विजय कुमार हे नाविन्य, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या त्यांच्या सिद्ध अनुभवांसह पदभार स्वीकारला आहे. मध्य रेल्वेला सुरक्षा, प्रवासी सोयीसुविधा, शाश्वतता आणि क्षमता वृद्धीच्या दृष्टीने आघाडीवर नेण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांची ही दूरदृष्टी भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासोबतच “मेक इन इंडिया”च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारत’ या ध्येयाच्या पूर्ततेसाठी पुरक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages