वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि तिथे कार्यरत असलेल्या अंतराळवीरांची काळजी कोण घेत आहे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारी निधी थांबल्याने ‘नासा’चे १५,००० हून अधिक कर्मचारी पगारी सुट्टीवर आहेत आणि त्यांची सर्व नियमित कामे थांबली आहेत. केवळ एक लहानसा अपवादात्मक कर्मचा-यांचा गट कामावर कायम आहे. या गटाचे मुख्य काम म्हणजे अंतराळवीर आणि महत्त्वाच्या उपकरणांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आहे.
‘नासा’च्या अधिकृत आपत्कालीन योजनांनुसार, अमेरिकन संसदेकडून नवीन निधी मंजूर होईपर्यंत दैनंदिन कामे आणि वैज्ञानिक संशोधन कार्य थांबवले जाते. मात्र, ज्या कामांमुळे मानवी जीवन, सुरक्षा किंवा मालमत्ता धोक्यात येऊ शकते, अशा महत्त्वाच्या मोहिमांना यातून सूट देण्यात आली आहे. या सूटमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे २४/७ (रात्रंदिवस) निरीक्षण करणे समाविष्ट आहे. सध्या अमेरिकन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय भागीदारांसह अंतराळ स्थानकावर राहत आणि काम करत आहेत. निधीची कमतरता असूनही, ‘नासा’चे आवश्यक कर्मचारी मिशन कंट्रोलमध्ये वेतन न घेता काम करत आहेत, कारण अंतराळवीरांची सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी त्यांची भूमिका अत्यावश्यक मानली गेली आहे.
शिक्षण आणि जनजागृतीचे कार्यक्रम, बहुतेक संशोधन प्रकल्प, तसेच आर्टेमिस (अ१३ीे्र२) चांद्र मोहीम आणि मंगळ मोहीम यांसारख्या नवीन विज्ञान मोहिमांचा विकास थांबला आहे. सार्वजनिक संपर्क आणि प्रेस अपडेट्सही बंद आहेत, ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामांची अधिकृत माहिती मिळणे दुर्मीळ झाले आहे.
०९ ऑक्टोबर २०२५
‘नासा’चे कामकाज सरकारी निधी अभावी ठप्प!
Tags
# देश-विदेश
Share This
About JPN NEWS
देश-विदेश
Tags
देश-विदेश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Author Details
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा