राज्यात नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यात नोव्हेंबरपासून एअर अ‍ॅम्ब्युलन्स

Share This


मुंबई - राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. त्यात आता राज्यातील नागरिकांच्या आरोग्य आपत्कालीन वैद्यकीय सेवेत मोठी झेप ठरणारी एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा राज्य सरकार नोव्हेंबरपासून सुरू करणार आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार असून, ही सुविधा महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस -१०८) अंतर्गत उपलब्ध होणार असल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच राज्यभर नव्या स्वरूपातील २०० अत्याधुनिक भूमीवरील रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस आणि कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही ट्रायएज सिस्टीमसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.

तसेच ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी प्रणालीही बसवली जाईल. ही रुग्णवाहिका 5G तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यामध्ये व्हेंटिलेटरसह २५ हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील. नव्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अधिक सुलभ होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.

समुद्री बोटी रुग्णवाहिका सेवेत - 
आरोग्य विभागाला रुग्णवाहिका सेवेसंदर्भात येणाऱ्या तक्रारीचा विचार करून ही सेवा अधिक कार्यक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमित एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत १० वर्षांचा करार करण्यात आला असून, पहिल्या टप्यात २०० रुग्णवाहिका रस्त्यावर धावणार असल्याचे सांगितले. एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या सेवेव्यतिरिक्त, समुद्री बोटी रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत. ज्यामुळे किनारी स भागातील आपत्कालीन परिस्थितीतही तत्काळ मदत शकेल असे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages