
मुंबई - मुंबईतून नैऋत्य मोसमी पावसाची (South West Monsoon) अधिकृत माघार झाली आहे असे भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले आहे. आता ऑक्टोबर महिन्यात थंड हवामानाची चाहूल आणि हिवाळ्याचा प्रारंभिक अनुभव मुंबईकरांना जाणवू लागेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
सप्टेंबर अखेरीपर्यंत अधूनमधून हलका पाऊस झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबई व उपनगरांमध्ये कोरडे हवामान होते. हवामान खात्याने निरीक्षणानुसार आर्द्रतेत घट आणि तापमानात वाढ लक्षात घेऊन मोसमी पावसाची माघार जाहीर केली आहे. यासोबतच कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रातही हळूहळू पावसाची माघार सुरू होणार आहे.
मोसमी पावसाने यंदा मुंबईला चांगला पाऊस दिला. एकूण सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस नोंदवला गेला. मात्र, सप्टेंबरनंतर हवामानात झालेला बदल आणि वाऱ्याची दिशा उत्तर-पश्चिमेकडे वळल्याने मोसमी पावसाचे आगमन संपुष्टात आले आहे.

No comments:
Post a Comment