बोरिवलीत भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला, महिलेला गंभीर दुखापत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बोरिवलीत भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला, महिलेला गंभीर दुखापत

Share This

मुंबई - मुंबईत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे मुंबईकर त्रस्त झाला आहे. भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेण्याचा प्रकारही वाढले आहेत. असाच एक प्रकार बोरिवली पश्चिम येथील ओल्ड एमएचबी कॉलनीमध्ये काल (11 ऑक्टोबर) घडला. काल दुपारी एका महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. (Stray dog ​​attacks woman in Borivali)

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेला कुत्र्याने पायावर चावा घेतला, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली असून, नागरिकांना ओल्ड एमएचबी कॉलनी परिसरातून जाताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages