.jpeg)
मुंबई - मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी राबविण्यात आलेली उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेमध्ये शून्य ते पाच वयोगटातील एकूण ८,४३,२९४ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ५,५१,४४३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले असून, एकूण ६५.३९% कामगिरी नोंदविण्यात आली आहे.
मागील उप राष्ट्रीय पोलिओ मोहीम ८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली होती, त्यावेळी ६५.६६% इतकी कामगिरी झाली होती. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान IPPI (Intensive Pulse Polio Immunization) अंतर्गत घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना लसीचे डोस देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवून “पोलिओमुक्त भारत” या मोहिमेला गती मिळावी हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे.

No comments:
Post a Comment