
मुंबई (जेपीएन न्यूज) - पवई परिसरातील राज ग्रँड डोई बिल्डिंग, हिरानंदानी हॉस्पिटलच्या समोरील सेप्टिक टाकीमधील गॅसमुळे दोन मजुर बेशुद्ध झाले. त्यापैकी एका मजुराचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार 12 नोव्हेंबर) सकाळी उल्ट्राटेक प्रा. लि. या संस्थेच्या दोन कामगारांना सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट (STP) स्वच्छ करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, गॅसचा त्रास होऊन दोघेही टाकीमध्ये अडकले आणि बेशुद्ध पडले. घटनास्थळी तत्काळ मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस, 108 रुग्णवाहिका, आणि महापालिकेचा विभागीय कर्मचारीवर्ग दाखल झाला. दोघांनाही बाहेर काढून हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची नोंद संबंधित पोलिसांनी केली असून अधिक तपास सुरू आहे.
➡ जखमींची माहिती:
1 फुलचंद कुमार (28 वर्षे) – गंभीर, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
2 अज्ञात पुरुष (20–25 वर्षे) – रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले

No comments:
Post a Comment