मुंबई - नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून ३१ डिसेंबरपर्यंत विविध आस्थापनांवर अचानक धाडी घातल्या जाणार असून तेथे तपासणी करणार आहे. अन्नाच्या भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी अशी पथके तयार केली जातील, अशी माहिती महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
अन्नपदार्थांचे पुनर्वापर, अन्नाची गुणवत्ता, पॅकेजिंग, कमी प्रकाश असलेल्या बार तसेच रेस्टॉरंट्समध्ये असलेली प्रकाशयंत्रणा आणि वितरणसेवा, देखभाल यावरील नियमांकडे एफडीए लक्ष देईल. मद्यपान करणाऱ्या रेस्टॉरंट्समध्ये रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता सुनिश्चित करावी लागेल, असेही ते म्हणाले.
बार आणि स्वयंपाकघर स्वच्छ असले पाहिजेत. जर अन्नाचे नमुने आवश्यक ती मानके पूर्ण करत नसतील तर कायदेशीर कारवाई केली जाईल. नोंदणी प्रमाणपत्रे असलेल्या लहान विक्रेत्यांना चक्रवाढ दंड आकारला जाईल, तर अन्नसेवांच्या गैरव्यवस्थापनावर कारवाई म्हणून रेस्टॉरंट्सचा परवाना निलंबित केला जाईल, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

फूड आउटलेट्सकडून गैरव्यवस्थापनाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास ग्राहकांनी आम्हाला कळवावे. त्याची पुरेपूर दखल घेतली जाईल. जर सरकारने कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली तर आम्ही त्यानुसार ही तपासणी करू, असेही मंत्रीमहोदय म्हणाले.

No comments:
Post a Comment