बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बृहन्मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध

Share This

मुंबई - राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण आज (दिनांक २८ नोव्हेंबर २०२५) रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत काढण्यात आली. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ साठीच्या एकूण २२७ जागांपैकी अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता ६१ जागा राखीव झाल्या. तर, एकूण २२७ जागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. यापैकी ८ जागा अनुसूचित जाती (महिला), १ जागा अनुसूचित जमाती, ३१ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तर ७४ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. 

याच अनुषंगाने, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आदेशान्वये, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण आज (दिनांक २८ नोव्हेंबर २०२५) रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages