
मुंबई - फलटण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. या निर्णयाचे मुंबईतील बीएमसी मार्डतर्फे स्वागत करण्यात आले आहे.
“उशिरा का होईना, परंतु न्याय आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे बीएमसी मार्डचे महासचिव डॉ. अमर अगमे यांनी म्हटले. तसेच या प्रकरणात मार्डने सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा अखंडित सुरू राहील. डॉक्टरांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी आमची बांधिलकी कायम आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, घटनेमागील कारणांचा संपूर्ण तपास आणि संबंधित यंत्रणेची भूमिका तपासली जाणार आहे.

No comments:
Post a Comment