
रेल्वे पोलीस आयुक्त पी. कलामसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जून ते नोव्हेंबर 2025 या काळात सुसंघटित तपास पथकांनी राज्यासह देशभरातील विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली. या दरम्यान महाराष्ट्रातील 684 तसेच इतर राज्यांतील 334 मिळून एकूण 1,018 मोबाईल फोन परत मिळाले.
विशेष म्हणजे, सायबर तांत्रिक सहाय्याच्या मदतीने चोरीचा मागोवा घेणे, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन ट्रॅकिंग, तांत्रिक विश्लेषण अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी ही मोहीम परिणामकारक बनवली.
मोहीमेतील मुख्य आकडेवारी :
महाराष्ट्रातून हस्तगत केलेले मोबाईल : 444
महाराष्ट्राबाहेरून मिळालेले मोबाईल : 216
इतर राज्यांतून मिळालेले मोबाईल : 358
एकूण हस्तगत मोबाईल : 1018
एकूण किंमत : ₹1,80,33,668
या मोहिमेत पोलीस उपआयुक्त एम. पी. एम. लोखंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा अधिकारी, तांत्रिक पथके आदींचे विशेष योगदान राहिले.
मुंबई रेल्वे पोलिसांच्या या संयुक्त आणि प्रभावी कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्यास मदत झाली आहे.

No comments:
Post a Comment