Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यातील शाळाबाह्य मुलांचे नोव्हेंबरमध्ये मेगा सर्वेक्षण

स्वयंसेवी संघटनाच्या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा निर्णय
मुंबई दि. 2 सप्टेंबर-राज्यातील शाळाबाहय मुलांचे प्रमाण अधिक संख्या असेलेले जिल्हा शोधून या जिल्हयामधील शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संघटना यांची एकत्रित राज्यस्तरिय समिती स्थापन करण्यात येईल. समितीमध्ये शिक्षण विभागाचे दोन-तीन अधिकारी तसेच स्वयंसेवी संघटनामधील प्रतिनिधींचा समावेश असेल आणि ही नव्याने नियुक्त करण्यात येणारी समिती येत्या नोव्हेंबर मध्ये राज्यामधील जिल्हयानिहाय शाळाबाह्य मुलांचे मेगा सर्वेक्षण सुरु करेल असा शालेय शिक्षण मंत्री निर्णय विनोद तावडे यांनी आज या बैठकीत घेतला.

राज्यातील शाळाबाहय मुलांच्या सर्वेक्षणबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली. या बैठकीला स्वयंसेवी संस्था, संघटना,शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. श्री. तावडे यांनी यावेळी उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची मते जाणून घेतली. हे सर्वेक्षण अधिक प्रभावीपण आणि परिणामकारक कश्या पध्दतीने करण्यात येईल याबाबतही चर्चा करण्यात आली. -आजच्या बैठकीमध्ये शाळाबाह्य मुलांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्यात येईल. शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संघटना एकत्रित रित्या सर्वेक्षणाची जबाबदारी पूर्ण करण्यात येईल.

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या कामामध्ये वीटभट्टी कामगार, उसतोडणी कामगार, दगड-खाणी मध्ये काम करणारे मजूर आदी कामगार व मजूरांच्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण प्रामुख्याने करण्यात येईल.या सर्व मुलांना प्रथम शाळेत आणण्यात येईल आणि त्यांना शिक्षण देण्यात येईल. तसेच ज्या राज्यामध्ये ज्या खाणी नोंदणीकृत नाही अश्या खाणी गुगल मॅपिंगच्या सहाय्याने शोधुन काढण्यात येतील आणि तेथे काम करणा-या मजूरांच्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले,

काही कामगारांची मुले ही विदर्भामधून छत्तीसगड मध्ये जातात, तसेच छत्तीसगड मधील मुलेही आपल्या पालकांसमेवत विदर्भामध्ये येतात. अशा मुलांची यादी तयार करुन त्यांना पुन्हा शाळेत कशा प्रकारे दाखल करता येईल यासाठी प्राधान्य देण्यात येईल. महाराष्ट्रातील विविध प्रकारचे काम करणारी मुले ही सुरतमध्येसुध्दा जातात, तसेच येथील मुले ही कर्नाटकमध्येही जातात, त्यामुळे अशा सर्व मुलांना शोधून त्यांचे पुन्हा शाळांमध्ये पुनर्वसन करण्याच्या कामाला अधिक प्राधान्य देण्यात येईल असेही तावडे यांनी सांगितले.

याबैठकीला शिक्षण आणि शाळाबाह्य मुलांच्य क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संघटनाचे हेरंब कुलकर्णी, प्रथमच्या फरिदा लांबे,शांतीवन चे दिपक नागरगोजे, श्रमजीवी संघटनेचे किसन चौरे,समर्थनचे रुपेश किर, नरोत्तम सेखसरिया फाऊंडेशनचे हेमांगी जोशी,मुंबई मोबाईल क्रेचेसचे वृशाली पिसपाती, संघर्ष वाल्मिकीचे दिनानाथ वाघमारे,संतुलनचे अड. रेगे शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त आदी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom