Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

स्थायी समितीत गंभीर विषयावरील चर्चे दरम्यान प्रशासनाच्या डुलक्या

File Photo 
मुंबई । अजेयकुमार जाधव - 
मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाच्या अश्या स्थायी समितीत नगरसेवक पोटतिडकीने प्रश्न मांडताना तसेच नागरिकांच्या सोयी सुविधांबाबत चर्चा करताना प्रशासन गंभीरतेने घेत नाही अशी नेहमी बोंब असते. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्याच्या महत्वाच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना बैठकीला प्रशासनाकडून उपस्थित असलेल्या अतिरिक्त पालिका आयुक्त आय. ए. कुंदन या डुलक्या काढत असल्याने नगरसेवकांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी वाढली असून प्रशासन झोपा काढत असल्याची चर्चा केली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैकी सर्वात महत्वाची समिती म्हणून स्थायी समितीला मान्यता आहे. स्थायी समितीकडे पालिकेच्या आर्थिक नाड्या असतात. पालिकेचा अर्थसंकल्प आणि कोणत्याही प्रस्तावासाठी आर्थिक मजुरी घेताना स्थायी समितीत चर्चा केली जाते. स्थायी समितीत चर्चा करून सदर प्रस्ताव मंजूर झाल्यावर सभागृहाची मंजुरी घेतली जाते. यामुळे स्थायी समितीत सर्वच राजकीय पक्ष आपले अनुभवी व अभ्यासू नगरसेवक स्थायी समितीत सदस्य म्हणून पाठवतात. हे स्थायी समिती सदस्य बैठकांमध्ये मुंबईकर नागरिकांचे प्रश्न मांडत असतात. तर कधी प्रशासनाच्या चुका निदर्शनास आणून देत असतात. मात्र या नगरसेवाकांनी मांडलेल्या सूचनांकडे आणि मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी आहे.

अश्या परिस्थितीत बुधवारी स्थायी समीतीच्या बैठकीमध्ये पश्चिम उपनगरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत २१८ कोटी रुपयांचे १२ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नंतर मात्र प्रशासनाने आपल्या अधिकारात काही रस्त्यांची कामे गाळली आहेत. यामुळेस्थायी समितीचा आवमान केला जात असल्याचे नगरसेवक प्रशासनाच्या निदर्शनास आणत होते. यावेळी नगरसेवकांनी ज्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांचे चुकीचे प्रस्ताव बनवले, त्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या अश्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी केली. मात्र नगरसेवक प्रशासनाविरोधात बोलत असताना अतिरिक्त आयुक्त कुंदन मात्र डुलक्या काढत होत्या.

प्रशासनाच्या वतीने उपस्थित असलेल्या कुंदन याच डुलक्या काढत असल्याने पत्रकार आणि नगरसेवकांमध्ये पालिका प्रशासन झोपा काढत असल्याची चर्चा सुरु होती. याच दरम्यान स्थायी समिती अध्यक्षांनी ४३ नंबरचा प्रस्ताव पुकारला. कुंदन यांनी याआधीच मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावावरील निवेदन वाचून दाखवले. मात्र यावेळी नगरसेवकांनी म्याडम ४३ नंबरचा प्रस्ताव सुरु आहे. आपण मगाशी मंजूर झालेल्या प्रस्तावावरील निवेदन वाचत असल्याचे निदर्शनास आणल्यावर कुंदन यांनी सॉरी बोलून वेळ मारून नेली. स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरायला हि चांगली संधी असताना नगरसेवकांनी कुंदन या झोपल्या होत्या मात्र मी बोलत असताना त्या झोपल्या असत्या तर आम्ही हरकत घेतली असती असे बोलून नगरसेवकांनीही कुंदन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom