पोलीसदीदी उपक्रमामुळे नराधम पित्याच्या मुसक्या आवळल्या

JPN NEWS
मुंबई - पोटच्या गोळ्याबरोबर अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम पित्याचे बिंग पोलीसदीदी उपक्रमामुळे फुटले आहे. पित्याकडून असा प्रकार होणाऱ्या अश्लील कृत्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांना देण्यात आल्यानंतर या नराधम पित्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, आग्रीपाडा परिसरात यातील पीडित मुलगी कुटुंबासह राहते. पीडित मुलगी त्याच परिसरातील एका शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, मुंबईत अल्पवयीन मुलींच्या निरागसतेचा फायदा घेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करण्याचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत आठवड्यातून एकदा पोलीसदीदी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश हा अल्पवयीन मुला-मुलींना त्यांना चुकीच्या पद्धतीने हात लावणाऱ्यांपासून सावध करणे आहे. तसेच त्यांना लैंगिक शोषणापासून वाचवणे हा आहे. त्यानुसार पीडित मुलीच्या शाळेत काही महिला पोलिसांना पाठवून मुलींना गुड टच आणि बॅड टचची माहिती पोलिसांनी दिली. या माहितीवरून एका १४ वर्षीय मुलीने आपले वडीलच आपल्यासोबत असे कृत्य करत असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानुसार एका समाजसेवा संस्थेच्या मदतीने त्या अल्पवयीन मुलीने पित्यावरच गुन्हा दाखल केला. त्या नराधम पित्याला पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये अटक केली आहे..
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !