मुंबईत २७५ नवीन रुग्ण - दोन रुग्णाचा मृत्यू



मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. बुधवारी २७५ रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्य़ांना घरी सोडण्यात आले.

मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्य़ेत दिलासादायक घट झाली आहे. तीनशे ते अडीचशेच्या आत रुग्णांची नोंद होत रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख ६० हजार २७० वर गेली आहे. तर ७ लाख ३८ हजार ५९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १६२९९ झाला आहे. सद्यस्थितीत २८२१ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांत ३९३६४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २०३१ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
Previous Post Next Post