कंगणा राणावतच्या बाष्कळ बडबडीला माध्यमांनी व्यासपीठ देऊ नये - नाना पटोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2021

कंगणा राणावतच्या बाष्कळ बडबडीला माध्यमांनी व्यासपीठ देऊ नये - नाना पटोले


मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२१ - 
अभिनेत्री कंगणा राणावत वारंवार बाष्कळ बडबड करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेले, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसैनिक आणि संपूर्ण देशाचा अवमान करत आहे. कंगणाच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन माध्यमांनी तिला व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ नये ही आमची विनंती आहे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

कंगणाच्या विधानावर बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कंगणा जी बडबड करत आहे ती भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्य लढ्याला बदनाम करण्याच्या कुटील डावाचाच भाग आहे. याला भाजपचाही पाठिंबा आहे असा आमचा आरोप असून भाजपने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी.

महाराष्ट्राला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र. के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, गोविंद तळवळकर असे महान संपादक, पत्रकार लाभले, त्यांनी अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडाडून प्रहार केला होता. आपण सर्वांनी याची आपण सर्वांनी याची आठवण ठेवून कंगणासारख्या समाजविघातक विखारी प्रवृत्तींना प्रसिद्धी देऊ नये असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना केले आहे.

या पत्रकार परिषदेला आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad