Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गायिका वैशाली शिंदे यांना रुग्णालयात जाऊन रामदास आठवले यांनी केली मदत



मुंबई - आंबेडकरी चळवळीच्या गायिका वैशाली शिंदे या के ई एम रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना मधुमेहाने त्रस्त आहेत. त्यांच्या पायाला जखम झाल्याने गॅंगरीन होऊन त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज परेल येथील के ई एम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गायिका वैशाली शिंदे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांना आर्थिक मदत केली.

गायिका वैशाली शिंदे यांच्यावर होत असलेल्या औषधोपचाराची माहिती घेत डॉक्टरांनी त्यांची काळजी घेण्याची सूचना आठवले यांनी केली. गायिका वैशाली शिंदे यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा राहून मदत करणार असून त्यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. गायिका वैशाली शिंदे यांना कृत्रिम पाय बसविण्याबाबत आठवले यांनी डॉक्टरांना सांगितले असून कृत्रीम पाय रोपणाची व्यवस्था ही केली आहे यावेळी आठवले यांनी 30 हजार मदत केली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वैशाली शिंदे यांना औषधोपचरासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले. रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी वैयक्तिक 20 हजारांची आर्थिक मदत वैशाली शिंदे यांना तातडीने दिली.

आंबेडकरी चळवळीतील लोककलावंत गायकांच्या पाठीशी रामदास आठवले नेहमी खंबीर उभे राहतात. कलावंतांच्या संकटकाळात त्यांना नेहमी मदत करतात. कलावंतांच्या सुखदुःखात धावून येणारे नेते म्हणून आठवले हे कलावंतांना नेहमी आपल्या जवळचे नेते वाटतात. आजारी पडलेल्या कलावंताला किंवा कार्यकर्त्याला भेटले की आजारी पडलेला माणसाला धीर मिळून चांगला होतो. रामदास आठवले हे आमचे वडील बंधू असल्यासारखे आमच्या पाठीशी उभे असतात. ते माझ्या प्रकृतीची चौकशी करायला आले यातच माझें समाधान आहे असे गायिका वैशाली शिंदे यावेळी म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom