पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खिचडीत अळ्या व उंदराची विष्ठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खिचडीत अळ्या व उंदराची विष्ठा


पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खिचडीत अळ्या व उंदराची विष्ठा
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत उंदराची विष्ठा आणि अळ्या सापडत असल्याचा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी महासभेत केला. त्यानंतर भाजपच्या नगरसेविकेने निकृष्ट दर्जाच्या खिचडीचे नमूने महासभेत दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खिचडी देण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी तपासून पाहावी, असे आदेश महापौरांनी दिले. 
  मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पोषक आहार म्हणून विद्यार्थ्यांना खिचडी दिली जाते; मात्र नेहमीच या खिचडीच्या दर्जावर प्रश्‍नचिन्हे उपस्थित होतात. उंदराची विष्ठा आणि अळ्या असलेली खिचडी विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संध्या जोशी यांनी आज महासभेत महासभेत केला. याला प्रतिसाद म्हणून भाजपच्या बिना दोशी यांनी निकृष्ट दर्जाच्या खिचडीचे नमुने सादर केले. यावर सर्वच सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच असली खिचडी देण्याऐवजी विद्यार्थ्यांना खजूर, गुळ, चणे, चिक्की, फळे असे पदार्थ द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS