इंदू मिलसाठी रिपाइंचे १५ ते २० ऑक्टोबरला जेलभरो - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

इंदू मिलसाठी रिपाइंचे १५ ते २० ऑक्टोबरला जेलभरो


इंदू मिलसाठी रिपाइंचे १५ ते २० ऑक्टोबरला जेलभरो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी १४ ऑक्टोबरआधी जमीन न मिळाल्यास राज्यभरात १५ ते २० ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑक्टोबर रोजी परळच्या कामगार स्टेडियममध्ये होणार्‍या मेळाव्याला राज्यभरातील एक लाख कार्यकर्ते हजेरी लावणार असल्याचे आठवले म्हणाले.
 
महायुतीसोबतच पुढील निवडणुका लढविणार असून २०१४ साली होणार्‍या निवडणुकीतील जागावाटपाबाबत लवकरच शिवसेना व भाजपशी चर्चा केली जाईल, असे रामदास आठवले म्हणाले. भ्रष्टाचारी सरकारला खाली खेचण्यासाठी दलितांनी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. २४ ऑक्टोबर ते १० जानेवारीपर्यंत राज्यभर सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. रिपाइं कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे केलेल्या आंदोलनावेळी स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे यांच्याकडून महिलांना मारहाण झाल्याच्या आरोपाची दखल घेऊन देशपांडे यांच्यावर कारवाईची मागणी आठवले यांनी केली. यावेळी राज ठाकरे यांच्याविरुद्धचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS