लोकलमधून प्रवाशाला फेकणारे चार पोलिस निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2012

लोकलमधून प्रवाशाला फेकणारे चार पोलिस निलंबित


लोकलमधून प्रवाशाला फेकणारे चार पोलिस निलंबित
हार्बर मार्गावर कुर्ला व टिळकनगर स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमधून प्रवाशाला खाली फेकण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेऊन त्या चार रेल्वे पोलिसांना निलंबित करण्याचा आदेश दिला. त्यानंतर रेल्वे पोलिस आयुक्‍त प्रभातकुमार यांनी त्यांना निलंबित केले. 
  हबीबुल्लाह अताउल्लाह खान हा 18 ऑगस्ट रोजी दुपारी कुर्ला ते टिळकनगर असा प्रवास करीत होता. या वेळी रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिसांनी खान याला मारहाण केली व नंतर त्याला धावत्या लोकलमधून खाली फेकले. यात हबीबुल्लाह जबर जखमी झाला. सध्या त्याच्यावर शीवमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो 23 ऑगस्टला शुद्धीवर आल्यावर त्यांनी या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर चौकशी होऊन पोलिस नाईक शंकर पाटील, सिद्धराम मंगानूर, पोलिस शिपाई राहुल जेधे व विजय ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांना काल (ता. 26) अटक करण्यात आली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS