दरवाढ, "एफडीआय'विरोधात "एमपीजे'चे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दरवाढ, "एफडीआय'विरोधात "एमपीजे'चे आंदोलन

Share This
दरवाढ, "एफडीआय'विरोधात "एमपीजे'चे आंदोलन
मुंबई - डिझेल दरवाढ, अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत केलेली घट, वाढती महागाई व रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) दिलेली परवानगी या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आज आझाद मैदानात "मुव्हमेंट फॉर पीस ऍन्ड जस्टीज' (एमपीजे)तर्फे आंदोलन करण्यात आले. 

शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या केरोसिनच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांत मोठी घट झाली आहे. एकीकडे केरोसिनचे प्रमाण कमी केले जात असताना गॅस सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणली जात आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचे जगणे कठीण झाल्याची टीका संघटनेने केली. "एमपीजे'चे अध्यक्ष मोहम्मद सिराज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages