नवी दिल्ली- विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे भाषण सुरू झाल्यावर एका तरुणाने शर्ट काढून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करीत प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुमार असे तरुणाचे नाव आहे. तो दिल्लीच्या पटियाला हाउस न्यायालयात वकील आहे. विज्ञान भवनात आज आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला पंतप्रधान मनमोहनसिंग प्रमुख पाहुणे होते. त्यांनी आर्थिक सुधारणांवर भाषण करण्यास सुरवात केल्यावर संतोष कुमारने सरकारविरोधी नारे देत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्याने बेंचवर चढूनही नारे दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असल्याचे समजते.


No comments:
Post a Comment