व्यंगचित्रकारांवर मर्यादा असावी : उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

व्यंगचित्रकारांवर मर्यादा असावी : उद्धव ठाकरे


व्यंगचित्रकारांवर मर्यादा असावी : उद्धव ठाकरे





मुंबई - देशाचे भेसूर चित्र निर्माण करणार्‍या नेत्यांवर कारवाई होत नाही, मात्र त्याचवेळेस वास्तव चित्र दाखवणार्‍यावर कारवाई केली जाते हे चुकीचे आहे. तरीही व्यंगचित्रकारांवरही मर्यादा घालायला हवी, असे प्रतिपादन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केले.

असीम त्रिवेदी प्रकरणी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही गोष्टींना अवाजवी महत्त्व दिले गेले आहे असे मला वाटते. या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे. मात्र असीम त्रिवेदीने देशद्रोहाचा आरोप ठेवण्याइतका मोठा गुन्हा केला आहे असे मला वाटत नाही. देशाचे भेसूर चित्र ज्यांनी निर्माण केले त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी चित्र काढणार्‍यावर कारवाई झाली, हे अयोग्यच आहे. मात्र व्यंगचित्रकारांनीही आपण काय काढतो याकडे लक्ष ठेवले पाहिजे, मर्यादा घालून घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS