रिपब्लिकन पक्षाचा "रास्ता रोको' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

रिपब्लिकन पक्षाचा "रास्ता रोको'

रिपब्लिकन पक्षाचा "रास्ता रोको'

मुंबई - डिझेलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांनी वाढ व सिलिंडरची सबसिडी कमी केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज आझाद मैदानाजवळ "रास्ता रोको'चा प्रयत्न केला. पोलिसांनी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेथून तत्काळ दूर केले. 

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्राने केलेली दरवाढ व सिलिंडरची सबसिडी कमी करण्याचा निर्णय हा देशातील सर्वसामान्य जनतेला उद्‌ध्वस्त करणारा आहे. रिपब्किलन पक्ष सरकारच्या जनताविरोधी धोरणाचा धिक्कार करीत आहे, असे रामदास आठवले या वेळी म्हणाले. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

शिवसेनेच्या वतीने निदर्शने करताना महिला 

फोटो - उदय कासारे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS