फोर्टमध्ये अवयवदानाचा संकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2012

फोर्टमध्ये अवयवदानाचा संकल्प


फोर्टमध्ये अवयवदानाचा संकल्प


फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अवयवदान करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल यावर्षी उचलले आहे समाजातील भक्तांमध्ये अवयवदाना विषयी जागृती करण्यासाठीही मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत 

महत्त्वाचे अवयव निकामी झाल्याने राज्यातील हजारो रुग्णांना जीव गमावावा लागतो समाजात याविषयी फारशी जागृती नसल्याने तसेच अवयव दानाविषयी अनेक गैरसमज असल्याने मृत्यूनंतर अवयव दानास मान्यता देणारे दाते पुढे येत नाही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधना नंतरही ही बाब अधोरेखित झाली या पार्श्वभूमीवर फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दहा कार्यकर्त्यांनी मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा संकल्प केला मंडळाचे प्रमुख संचालक रवींद्र सुर्वे यांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी सरकारी विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राकडे नाव नोंदणी करून डोनर कार्ड घेतले आहे त्यानंतर मंडळाच्या इतर दहा कार्यकर्त्यांनीही अवयवदानासाठी नाव नोंदणी केली मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या या मदतीचे प्रत्यारोपण समन्वय समितीनेही कौतुक केले आहे 

अवयव दान आणि प्रत्यारोपण याबाबत अनेकांच्या मनात अजूनही गैरसमज आहेत अचूक वैद्यकीय माहिती सर्वसामान्यांना समजावी यासाठी माहितीपत्रक भित्तीचित्रे तसेच माहितीपट यांच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याची माहिती सुर्वे यांनी दिली 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS