महिला प्रवाश्यांसाठीच्या राखीव डब्यांवर पुरुषांचा कब्जा .......... - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2012

महिला प्रवाश्यांसाठीच्या राखीव डब्यांवर पुरुषांचा कब्जा ..........


ladies.jpg
महिला प्रवाश्यांसाठीच्या राखीव डब्यांवर पुरुषांचा कब्जा ..........
मुंबई / दि.३/९/२०१२ / रशीद इनामदार
मुंबई नगरी आज दिवसभर संततधार पावसात भिजत होती.अधून मधून मुसळधार पावसाच्या सरी हि आल्या. नेहमीप्रमाणे या पावसात पुन्हा मुंबई आणि उपनगरांची वाहतूक व्यवस्था काहीशी विस्कळीत झाली. तिन्ही रेल्वेमार्गांवर काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत होत्या .रस्त्यांवर सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याच चित्र दिसत होतं. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची खूप गर्दी हि दिसून आली. त्यात नोकरी व्यवसायानिमित्त  प्रवास करणाऱ्या महिला प्रवासीही मोठ्या प्रमाणात होत्या . घरी जायला उशीर सर्वांनाच झाला होतं पण यावेळी लेडीज फर्स्ट म्हणून महिलांना सहकार्य करणाऱ्या चाकरमान्यांनी स्वार्थी वृत्तीचं दर्शन घडवलं. त्यांनी घरी जाण्याच्या गडबडीत थेट महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यावर कब्जा केला. परंतु ज्या माता-भगिनींसाठी हा डब्बा राखीव आहे त्यांना हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
   महिलांसाठीचे राखीव डबे हे २४ तास महिलासाठीच राखीव असताना देखील पुरुष प्रवासी त्या नियमाची हमखास पायमल्ली करत असतात.रात्री ११ नंतर महिलांसाठीचा राखीव डबा जनरल होतो असा काहीसा अलिखित नियम पुरुष प्रवासी पाळतात . त्यात काही प्रवासी या अलिखित नियमाचा वापर करून आपला परतीचा प्रवास त्या वेळेनुसारच करतात. यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना असुरक्षित वातावरणात प्रवास करावा लागतो.नियमानुसार रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांसाठी राखीव डब्यात एक पोलीस अधिकारी असायला हवा परंतु तसं क्वचितच पाहायला मिळत. आजतर सतत पडणाऱ्या पावसामुळे महिला प्रवासी चिंतीत, काहीश्या घाबरलेल्या अवस्थेत असताना पोलीस व पुरुष प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा होती . तसं ना होता पुरुष प्रवाशांनी स्वार्थी वृत्तीचं दर्शन घडवून त्यांच्या हक्काच्या राखीव डब्यावरच कब्जा केला.
     महिलांच्या हक्काची व रेल्वे च्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या पुरुष प्रवाशांवर रेल्वे प्रशासन रेल्वे पोलीस कडक कारवाई कधी करणार ? महिला रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल का ? कि यापुढेही असाच असुरक्षितपण सहन करावा लागेल असा संतप्त सवाल महिला प्रवासी करताना दिसत होत्या ........

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS