| आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महापौरांनी घेतला आढावा मुंबई : मुंबईसह उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महापौर सुनील प्रभू यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला अचानक भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून विश्रंती घेतलेल्या पावसाने सोमवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतूक मंदावणे, वृक्ष आणि घरांची पडझड अशा घटना घडण्याची शक्यता असते. शहरात घडणार्या दुर्घटना लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. या नियंत्रण कक्षाला महापौर सुनील प्रभू यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेऊन प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले. त्या वेळी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी महापौरांना पावसाची ताजी आकडेवारी सादर करून साचलेली ठिकाणे, त्यासाठी पंपाद्वारे सुरू असलेला निचरा तसेच नागरिकांच्या तक्रारीचे दूरध्वनी स्वीकारून तात्काळ करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती घेतली. त्या वेळी महापालिका उपाआयुक्त सुधीर नाईक आणि वरिष्ठ महापालिका अधिकारी उपस्थित होते. |
Post Top Ad
04 September 2012
Home
Unlabelled
आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महापौरांनी घेतला आढावा
आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महापौरांनी घेतला आढावा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment