मुंबई हिंसाचार : रझा अकादमीला दोन कोटींचा दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2012

मुंबई हिंसाचार : रझा अकादमीला दोन कोटींचा दंड


मुंबई हिंसाचार : रझा अकादमीला दोन कोटींचा दंड




मुंबई - रझा  अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चात मोठी तोडफोड केली. या घटनेच्या प्राथमिक तपासात गुन्हे शाखेने 2.12 कोटी रुपये नुकसानीचा अंदाज वर्तवला आहे. तपास पथक यासंबंधीची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणार आहे. त्यानंतर रझा  अकादमीकडून संबंधित रक्कम वसूल करण्यासाठी पत्र पाठवण्यात येईल. दंड न भरल्यास संघटनेच्या संपत्तीवर टाच आणली जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.  

 मदिनतुल इल्म संघटनने 11 ऑगस्ट रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. रझा  अकादमीने त्याला पाठिंबा दिला व त्यांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.  मोर्चात सहभागी जमाव अल्पावधीत हिंसक झाला आणि त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. यातील काही माथेफिरूंनी शहीद जवान स्मारकाची तोडफोड केली. रझा  अकादमीने नुकसान भरपाई न दिल्यास त्यांच्या संपत्तीवर टाच आणली जाईल; परंतु या प्रक्रियेला विलंब लागेल, असे एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS