पावसाचा दणका
सोमवार सकाळपासून होत असलेल्यादमदार पावसामुळे रेल्वेसेवा मंदावली आहे . पश्चिम ,मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या ३० ते ६० मिनिटे उशिराने धावत आहेत . मुंबई आणिठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळेमहत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे .त्यामुळे ऑफिसमधून घरी परतत असलेल्यानागरिकांची गैरसोय झाली आहे .
मुंबई छत्रपती शिवाजी स्टेशन (सीएसटी) ते अंधेरी मार्गावर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पनवेल, वाशीच्या दिशेने जाणा-या हार्बरच्या गाड्या ३० ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक ४० ते ६० मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. चुनाभट्टी येथे स्वदेशी मिलजवळ हरके चाळ येथे झोपडीची भिंत कोसळून २-३ जण जखमी झाले आहेत.
गोरेगाव, मालाड, कांदिवली, दहिसर, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी, खार, वांद्रे आणि परळ या भागांना तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली . मुंबई शहरालापाणीपुरवठा करणा-या महत्वाच्या धरणांपैकी एक असणारे तानसा धरण सोमवारी दुपारी एकवाजल्यापासून भरुन वाहू लागले आहे . मागील २४ तासात तानसा धरण परिसरात ४४ से . मी .पाऊस पडला असून धरणाचे ९ दरवाजे उघडण्यात आले आहे . सध्य स्थितीत धरणातून ९ हजार९४७ क्यूसेक्य पाणी सोडण्यात आले आहे . तानसा परिसरात आजपर्यंत एक हजार ६५० मिलीमीटर पाऊस पडला आहे .
मुंबईत येत्या 24 तासांत दमदार पावसाची शक्यता - सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने सायंकाळी 5.30 पर्यंत कुलाब्याला 43 मि.मी. तर सांताक्रूझला 71.9 मि.मी. पावसाची नोंद झाली.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी पाऊस
शहर - 30.24 मि.मी.
पूर्व उपनगरे - 80.45 मि.मी.
पश्चिम उपनगरे - 72.03 मि.मी.


No comments:
Post a Comment