आता निकोटिनयुक्त च्युइंगमवर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2012

आता निकोटिनयुक्त च्युइंगमवर बंदी


आता निकोटिनयुक्त च्युइंगमवर बंदी 
मुंबई - गुटखाबंदीनंतर आता सरकारने अन्य अमलीपदार्थांच्या विरोधात मोर्चा वळवला आहे. मोठय़ा प्रमाणावर युवक आहारी जात असलेल्या निकोटिनयुक्त च्युइंगमवरही कारवाई करण्याचे आदेश बुधवारी अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांनी दिले.

तंबाखू आणि सिगारेटच्या वापरावर बंदी नसली तरी च्युईगमच्या माध्यमातून निकोटिनयुक्त पदार्थांची बाजारात विक्री करणार्‍या आणि उत्पादन करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याचा निर्णय नाईक यांनी घेतला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी च्युइंगम तसेच फळांच्या जेलीच्या माध्यमातून निकोटिनयुक्त पदार्थांची विक्री केली जाते. सिप्ला या औषधी कंपनीने निकोटेक्स -4 ही जेली बाजारात आणली आहे. यामध्ये निकोटिन असून ही 4 मिलीग्रॅमची असल्याचे जेलीच्या वेष्टनावर छापण्यात आले आहे. तसेच अन्यही 2 मिलीग्रॅमची निकोटिनयुक्त जेली बाजारात विकली जात आहे. अशाप्रकारे जेलीतून निकोटिन सेवनास उपलब्ध करून देणे अयोग्य असल्याचे मत नाईक यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS